अॅपल कंपनीचा आयफोन केवळ फिचर्समुळं नव्हे तर त्याच्या किंमतीमुळंही जगभर प्रसिद्ध आहे. भारतात वेगवेगळ्या करांमुळे या फोनची किंमत खूप वाढते. आयफोन 13 भारतात आयात केला तर त्यावर 22.5 टक्के कस्टम ड्युटी लागू होते. याशिवाय, या स्मार्टफोनवर जीएसटीही आकारला जातो. आयफोनसाठी जीएसटीच्या सध्याच्या दरानुसार... खरेदीदाराला सुमारे 11 हजार रुपयांचा जीएसटी भरावा लागतो. आयफोनमध्ये मॉडेम हा सर्वात महागडा पार्ट्स असतो. आयफोन 12 च्या 5जी मॉडेमची किंमत सुमारे 90 डॉलर इतकी म्हणजे भारतीय चलनानुसार 6 हजार 700 रुपये एवढी आहे.