जॅक डोर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले भारतात जन्मलेल्या पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतली आहे. ट्वीटरशिवाय त्यांनी याहू, माइक्रोसॉफ्ट आणि AT&T यासारख्या दिग्गज कंपनीमध्ये काम केलं आहे. पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बे येथून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण घेतलं आहे. पीपलएआयनुसार पराग अग्रवाल यांची एकूण संपत्ती 1.52 मिलिअन डॉलर इतकी आहे. जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्वीट केलं. आपल्या ट्वीटमध्ये अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.