तुम्ही ट्विटरवर सक्रिय असाल आणि आत्तापर्यंत तुम्हाला काहीही ट्विट करताना शब्दमर्यादेमुळे समस्या येत असतील, तर ही एक दिलासादायक बाब आहे



सध्या ट्विटर अशा एका नव्या फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे तुम्ही आता ट्विटरवर मोठे लेख पोस्ट करू शकाल



कंपनीकडून या फिचरची चाचणी सध्या सुरू असून लवकरच हे फीचर सर्वांसाठी रिलीझ केले जाईल



रिपोर्टनुसार, मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरचे हे फीचर त्याचा सर्वात मोठा अडथळा दूर करेल



कंपनीकडून असे सांगण्यात येत आहे की, या फीचरमध्ये युजर्सना अधिक शब्दांची पोस्ट शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध होईल



याचा अर्थ ट्विटसाठी निश्चित केलेली शब्दमर्यादा हटवली जाणार आहे. म्हणजेच, तुम्ही 280 शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे ट्विट करू शकाल



आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार तुम्हाला हे फीचर ट्विटर आर्टिकलमध्ये उपलब्ध होईल



यामध्ये जाऊन तुम्ही सर्वात मोठा लेखही लिहू शकाल



येथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची शब्द मर्यादा दिसणार नाही