लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे झाला होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक कुशल थिएटर गायक होते. दीनानाथजींनी लतादीदी पाच वर्षांच्या असताना त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. त्याच्यासोबत आशा, उषा आणि मीना या त्यांच्या बहिणीही गायन शिकायच्या. लतादीदींनी 'अमान अली खान साहिब' आणि नंतर 'अमानत खान' यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत.