ट्विटर कंपनीने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सेवा बंद केली आहे. ही सर्व्हिस सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या ( Fake Account ) संख्येत झपाट्याने वाढू लागली होती त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत. ट्विटरची पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा बंद ॲप बनवणाऱ्या जेन मंचुन वोंग यांनी सांगितलं की, ट्विटरने 8 डॉलरच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे घेतला आहे