स्मार्टफोनमुळे आपली बरीच कामे सोपी झाली आहेत.



खरेदीपासून ते बँकिंग व्यवहारासाठी आता बँकेतही जावे लागत नाही.



स्मार्टफोन चोरी झाल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.



सायबर गुन्हेगारीचे वाढता प्रमाण पाहता फोन चोरी झाल्यानंतर तातडीने आवश्यक पावले उचलावीत.



स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर तुम्ही आधी तातडीने तुमचा मोबाइल फोन सीम कार्ड ब्लॉक करावा.



त्यामुळे त्या क्रमांकावर फोन कॉल अथवा मेसेज मिळणार नाही.



तुम्ही बँकिंग अॅप वापरत असाल तर तेदेखील ब्लॉक करावे.



त्यासाठी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.



इंटरनेट बँकिंग देखील बंद करण्यासाठी कस्टमर केअरला विनंती करू शकता.



तुम्ही युपीआय अॅप वापरत असाल तर पेटीएम, फोन पे आदी ब्लॉक करावेत.



शक्य झाल्यास आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बदलावा.