ट्विटरची मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्याकडे आली आहे.



ट्विटरवरील ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.



ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाऊंटना मिळणाऱ्या ब्लू टिकसाठी युजर्सला पैसे भरावे लागणार आहेत.



ट्विटरवर सबस्क्रिप्शन मॉडेल राबवण्यात येणार आहे.



भारतात ब्लू टिकची पेड सर्व्हिस कधीपासून सुरु होणार याबाबत मस्क यांनी सांगितलं आहे.



एका भारतीय युजरने ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांना प्रश्न विचारला होता.



त्यावर मस्क यांनी भारतातील सबस्क्रिप्शनबाबत माहिती दिली.



मस्क यांनी भारतात एक महिन्याच्या आत सबस्क्रिप्शन मॉडेल लागू होणार असल्याचे सांगितले.



ट्विटरने प्रति महिना आठ डॉलर दराने सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे.



सध्या ट्विटर पेड सर्व्हिस अमेरिकी, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरु आहे.



या सबस्क्रिप्शनमध्ये युजर्सना अनेक नवीन फीचर्सचा लाभही मिळणार आहे.