गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा जगभरातील अनेक देशांवर परिणाम होत आहे.

भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युक्रेनमधील बुखारेस्टला पाठवलेले एअर इंडियाचे विमान आता भारतात येण्यासाठी रवाना झाले आहे.

रात्री आठ वाजता हे विमान मुंबईत दाखल होणार आहे.

219 भारतीयांसह हे विमान रोमिनियाहून मुंबईसाठी रवाना झाले आहे.

आज मुंबईहून हे विमान रवाना करण्यात आले होते.

प्रवाशांनी विमानतळावर कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे.

युक्रेनवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी फ्री वाय फाय, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पाणी आणि अन्न पदार्थ इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.

युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज झाले आहे.