'तुझी माझी रेशीमगाठ' मधली नेहा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री आहे. नुकतेच तिने तिचे एका खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलाय. हातात पांढऱ्या रंगाची फूलं देखील घेतली आहेत. मोकळ्या केसांमधला हा फोटो खूप सुंदर आलाय. प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत.