तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता. 24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शिझानवर गुन्हा दाखल केला होता. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज केला होता. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला.