बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनआणि सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हृतिक आणि सबा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. आता हृतिक आणि सबा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. हृतिक आणि सबाची लव्हस्टोरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हृतिक-सबा एकमेकांना डेट करत असून त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. एकमेकांसोबतचे फोटो हृतिक-सबा सोशल मीडियावर शेअर करत असतात. सबा सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी हृतिक सुझान खानसोबत लग्नबंधनात अडकला होता. हृतिकचा 'विक्रम वेधा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हृतिकचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिक आणि सबाच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.