बदामाच्या फायद्यांबरोबरच बदामाचे अनेक तोटेही आहेत.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम उपयुक्त आहेत पण जास्त सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकतात.
बदामाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात.
जास्त बदाम खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट खराब होण्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही बदाम जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.
बदामामध्ये फॅट आणि कॅलरीज भरपूर असतात. जर तुम्ही जास्त बदाम खाल्ले तर यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.
बदामामुळे कधीकधी काही लोकांमध्ये ओरल ऍलर्जी सिंड्रोम होतो, ज्यामुळे घसा खवखवतो, जीभ आणि ओठांना तीव्र सूज येते आणि तोंडाला खाज सुटते.
खूप बदाम खाल्ल्याने तुम्हाला किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.