कोणीही शिंकल्यावर, त्याला God Bless You का म्हणतात?
Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels
शिंक कुणालाही आणि केव्हाही येऊ शकते.
Image Source: pexels
बहुतेक वेळा, तुम्ही ऐकलं असेल की, कोणीतरी शिंकल्यावर, समोरची व्यक्ती त्याला God Bless You म्हणते.
Image Source: pexels
पण, तुम्ही कधी विचार केलाय का? शिंकल्यावर God Bless You का म्हणतात?
Image Source: pexels
असं म्हटलं जातं की, रोममध्ये एका आजाराच्या काळात गॉड ब्लेस यू म्हणण्याची सुरुवात झाली.
Image Source: pexels
या आजाराची लक्षणं खोकणं आणि शिंकणं होती, ज्याला ब्युबोनिक प्लेग असं म्हटलं गेलं.
Image Source: pexels
आणि जेव्हा एखादी व्यक्ती ब्यूबोनिक प्लेगनं ग्रस्त होत असे, तेव्हा पोप ग्रेगरीनं अशा व्यक्तीच्या शिंकण्यावर गॉड ब्लेस यू म्हणायला सुरुवात केली आणि लोकांनाही गॉड ब्लेस यू म्हणायला सांगितले.
Image Source: pexels
यामागे असं मानलं जात होतं की, गॉड ब्लेस यू म्हणाल्यास पीडित व्यक्तीला मरणापासून वाचवता येतं.
Image Source: pexels
याव्यतिरिक्त, असंही मानलं जातं की, शिंकताना माणसातून वाईट आत्मा बाहेर पडतो.
Image Source: pexels
अशा परिस्थितीत गॉड ब्लेस यू म्हटलं, तर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात वाईट आत्म्याचा प्रवेश होत नाही, असं मानलं जातं.