बीड (Beed) मधील एका तरुणाने अनोखा निर्णय घेतला आहे. एका तृतीयपंथीयासोबत (Transgender) विवाह करण्यासाठी हा तरुण पुढे आला आहे. मागील अडीच वर्षांपासून बीडमधील किन्नर सपना आणि बाळू लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे बाळूला अनेकांनी हिणवले. मात्र संसार मला करायचा आहे समाजाला नाही, असं म्हणून त्याने सपनावरचं प्रेम कमी होऊ दिले नाही. किन्नर सपना आणि बाळूच्या या प्रेम प्रकरणाला बीड पत्रकार संघाने समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे