दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण सध्या 'भीमला नायक' सिनेमामुळे चर्चेत आहे. 'भीमला नायक' हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'भीमला नायक' सिनेमात पवन कल्याण पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. पवन कल्याणसह राणा दग्गुबतीदेखील सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. पवन कल्याणचे सिनेमातील नाव भीमला नायक आहे. 'भीमला नायक' सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवरदेखील प्रदर्शित होणार आहे.