माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात.

कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात.

'व्हॅलेंटाईन डे'ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती.

आता त्यांनी त्यांच्या आगामी 'शिव तांडव स्त्रोतम' या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे.

हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टरमध्ये अमृता फडणवीस शंकराच्या अवतारात दिसत आहेत.

हे गाणे अमृता फडणवीसांनी गायले असून शैलेश दाणीने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

अमृता फडणवीसांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.