ओकलाने ( Ookla ) नुकताच 5G स्पीडशी संबंधित एक नवा अहवाल शेअर केला आहे. या अहवालामध्ये जगातील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोनची यादी जाहिर करण्यात आली आहे.
Motorola चा MOTO G 5G PLUS स्मार्टफोन ब्राझीलमधील 5G डाउनलोड स्पीड रेसमध्ये आघाडीवर आहे. याचा 5G डाउनलोड स्पीड 358.39 Mbps आहे.
आयफोन 13 प्रो मॅक्स ब्राझील, व्हिएतनाम, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये सर्वात वेगवान 5G स्पीड देण्यात सक्षम आहे.
ॲपलचा IPHONE 13 PRO MAX हा फोन सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन म्हणून समोर आला आहे.
OnePlus 9 ने चीन आणि जर्मनीमध्ये वेगवान 5G स्पीड दाखवला आहे. OnePlus 9 चा 5G डाउनलोड स्पीड 349.15 Mbps आहे.
अहवालानुसार, OnePlus 9 हा चीन आणि जर्मनी दोन्ही देशांमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन मानला गेला आहे.
Huawei P40 5G स्मार्टफोन चीनमध्ये सर्वात वेगवान आहे.
Huawei P40 5Gचा 5G डाउनलोडिंग स्पीड 344.41 Mbps आहे.
ब्राझीलमध्ये, Poco X4 Pro ने त्याचा 5G डाउनलोड स्पीड 355.43 Mbps नोंदवला आहे.
MOTO G 5G PLUS नंतर POCO X4 PRO 5G हा दुसरा सर्वात वेगवान 5G फोन आहे.