टोमॅटो आम्लयुक्त असतात, जे तुमच्या पोटात अधिक गॅस्ट्रिक अॅसिड तयार करण्याचे काम करतात.
जास्त टोमॅटो खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात.
टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी आणि एडेमाची समस्या उद्भवू शकते.
कारण टोमॅटोमध्ये सोलॅनिन नावाचा अल्कलॉइड असतो. यामुळे सांध्यांना सूज आणि वेदना होऊ शकतात. टोमॅटो ऊतींमध्ये कॅल्शियम तयार करतात, ज्यामुळे पुढे जळजळ होऊ शकते.
टोमॅटोमध्ये आढळणारा हिस्टामाइन हा घटक त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जीची समस्या निर्माण करू शकतो.
जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. तोंड, चेहरा आणि जिभेला सूज येणे, घशातील संसर्ग यांसारख्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया जाणवू शकतात.
किडनीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टोमॅटोचे सेवन करू नये.
कारण त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. टोमॅटो, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप आणि इतर टोमॅटो-आधारित पदार्थांचे सेवन टाळल्याने रक्तातील पोटॅशियमची उच्च पातळी कमी होण्यास मदत होते.