वजन कमी करणे हे एखाद्या कठीण कामापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय प्यावे हा प्रश्न जवळपास प्रत्येकाला पडतो.

वजन कमी करण्यासाठी सोपे आणि आरोग्यदायी पेय शोधत आहात, तर ही स्वादिष्ट कॉफीची रेसिपी एकदा नक्की करून पहा.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ही वजन कमी करणारी कॉफी काही मिनिटांत बनवू शकता. ही रेसिपी फक्त 5 मिनिटांत तयार होणारी आहे.

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सोपे पेय शोधत असाल, तर वजन कमी करण्यासाठी ही कॉफी सर्वोत्तम पर्याय आहे.

ही क्लास कॉफी बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी टाका आणि त्यात दालचिनीची काडी टाकल्यानंतर उकळा. दालचिनी टाकलेले पाणी पुरेसे गरम झाले की, त्यात एक चमचा कॉफी पावडर टाका आणि कॉफी घट्ट होईपर्यंत उकळू द्या.

अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचे मध घालून वजन कमी करणारी कॉफी सर्व्ह करा. लिंबाचा रस आणि मध कॉफीची चव वाढवेल. यामध्ये तुम्ही मधाचा वापर तुम्हाला हवा असेल तर करू शकता.

कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात कॉफी प्यावी.

कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चं म्हणणं आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.