सध्या सर्वसामान्यांना मात्र टोमॅटोच्या दरवाढीचा फटका बसल्याचं दिसून येत आहे.



टोमॅटोच्या दरानं विक्रमी उंची गाठली आहे.



गृहीणी टोमॅटो खरेदी करताना आणि स्वयंपाक करताना टोमॅटोचा वापर करताना दोन नाही तर, चार वेळा विचार करत असल्याचं चित्र आहे.



टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटेल व्यवसायिकांवरही झाला आहे. परिणामी हॉटेलमधील शाकाहारी थाळीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.



जूनच्या तुलनेत शाकाहारी थाळीच्या किमतीत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.



रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या 'रोटी-तांदूळ दर' अहवालात ही माहिती समोर आली आहे.



या अहवालानुसार, टोमॅटोच्या वाढलेल्या दराचा परिणाम शाकाहारी थाळीवर झाला असून मांसाहारी थाळीवर तुलनेने कमी परिणाम झाला आहे.



मांसाहारी थाळीची किंमत फक्त 11 टक्क्यांनी वाढली आहे.



रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालानुसार, सलग तिसऱ्या महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत वाढली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा वार्षिक दराच्या दृष्टीकोनातून किंमती जास्त प्रमाणार वाढल्या आहेत.



टोमॅटोचे भाव जुलैमध्ये 233 टक्क्यांनी वाढून 110 रुपये प्रति किलोवर पोहोचले, जे जूनमध्ये केवळ 33 रुपये प्रति किलो होते.