नुह येथे झालेल्या दंगलीसाठी कारणीभूत असलेल्या इमारती आणि घरावर कारवाई करण्यात आली ती बांधकामं पाडण्याचं काम गेली चार दिवस सुरू आहे. 100 घरे आणि 500 झोपड्या या कारवाईअंतर्गत हटवण्यात आल्या. कारवाई करण्यापूर्वी नोटीस का दिली नाही असा सवाल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने केला नोटीस दिल्याशिवाय बांधकामं कशी पाडली, असेही न्यायालयाने हरयाणा सरकारले विचारले तसेच तात्काळ कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत नूह येथे धार्मिक मिरवणुकीनंतर उसळलेल्या दंगलीत दगडफेक करण्यात आली दगडफेक ज्या इमारती आणि घरांवरून करण्यात आली त्यांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली बांधकामं अवैध असल्याचं सांगत हरयाणा सरकारकडून पाडकाम सुरू झालं. या प्रकाराची दखल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने घेतली असून ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत.