आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा खासदार राघव चढ्ढा चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दिल्ली सेवा विधेयकाबाबत एका प्रस्तावात चढ्ढा यांच्यावर पाच खासदारांची नावं त्यांना न विचारता जोडल्याचा आरोप पाचपैकी एकाही खासदाराची सही या प्रस्तावावर नाही या पाचही खासदारांनी चढ्ढांविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. नरहनी अमीन, सुधांशू त्रिवेदी, सस्मित पात्रा, तंबीदुराई आणि पी. कोन्यॅक या पाच खासदारांनी नोटीस दिली याबद्दल चड्ढा यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. हक्कभंग समितीची नोटीस येऊ द्या, मग मी उत्तर देईन असं चढ्ढा म्हणाले. प्रस्तावावर स्वाक्षरी कशी झाली याचा तपास व्हावा अशी मागणी गृहमंत्री अमित शाहांनी केली हक्कभंगाचा प्रस्ताव भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी आणि नरहरी अमीन आणू शकतात