चांद्रयान-3 नं पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. इस्रोनं 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पाठवलं. आता चांद्रयान-3 चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगानं फिरतंय. चांद्रयानानं चंद्राचे काही फोटो देखील पाठवलेत. सर्व फोटोंमध्ये गोल्डन रंगाचं यंत्र दिसतंय ते चांद्रयानाचं सोलार पॅनल आहे. प्रत्येक छायाचित्रात चंद्र मोठा आणि आणखी स्पष्ट दिसतोय चांद्रयानानं पाठवलेल्या फोटोंमध्ये चंद्राचा पृष्ठभाग आणि त्यावरील मोठमोठे खड्डे स्पष्ट दिसतायत प्रत्येक छायाचित्रात चंद्र मोठा आणि आणखी स्पष्ट दिसतोय चंद्राची कक्षा पकडण्यासाठी चांद्रयान-3 चा वेग ताशी 3600 किलोमीटर इतका वाढवण्यात आलाय 17 ऑगस्टला चांद्रयानाचे प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. 18 आणि 20 ऑगस्ट रोजी डीऑर्बिटिंग होईल. 23 ऑगस्टला चांद्रयानाची चंद्रावर लँडिंग नियोजित आहे.