उशी न घेता झोपल्याने आपल्याला शांत झोप घेण्यास मदत होते. उशीचा वापर न केल्याने निद्रानाशाची समस्याही दूर होईल. मान आणि खांद्याच्या साधारण वेदना कमी करण्यासाठी उशी न घेता झोपणे. उशी न घेता झोपल्याने पाठीचा कणा स्थिर राहतो. उशी न घेता झोपल्यास कुबड येणे या विषयी काही समस्या असल्यास कमी होते. उशीचा वापर न केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होते. उशी न घेता कोणत्याही पोझिशनमध्ये झोपायला तुम्हाला त्रास होणार नाही. उशीची जाडी मोठी असल्यास आपल्या मेंदुवर नको तेवढा तणाव येऊ शकतो. ज्यामुळे मानसिक आजार होऊ शकतात. उशी न घेता झोपल्यास चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात तसेच त्वचेला फायदा होतो. उशी न घेतल्याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस किंवा तणाव येणे कमी होते.