टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दाखवणार आपली हीरोपंती! अभिनेता टायगर श्रॉफ याने 2014 मध्ये 'हीरोपंती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील रोमान्स, दमदार अॅक्शन आणि क्रितीसोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता लवकरच टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यासोबतच निर्मात्यांनी 'हीरोपंती 2'चा ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या या नवीन पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ सूट-बूटमध्ये एकदम टिप-टॉप दिसत आहे. (photo:tigerjackieshroff/ig)