टिक टॉक दिन हा सरत्या वर्षाची आठवण करून देणारा आहे. त्यामुळे तुमच्या टू डू लिस्टमध्ये काही कामे करायची बाकी असतील तर ती आत्ताच करून घ्या.
टिक टॉक डे हा त्याचीच आठवण करून देणारा दिवस आहे.
प्रत्येक सणाच्या उत्सवामागे एक उद्देश असतो. टिक टॉक दिनाची कथा फार प्रसिद्ध आहे.
एका कथेत असा दावा केला जातो की, दोन मित्र जे मद्यपान न करता नवीन वर्षाच्या उत्सवासाठी पार्टी करण्यासाठी पर्याय शोधत होते त्यांनी या सुट्टीचा शोध लावला.
वर्षाचे शेवटचे काही तास घड्याळात नवीन वर्षाची मोजणी पाहण्यात घालवण्यासाठी, त्यांनी रात्री 12 नंतरचा अलार्म सेट करण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी 29 डिसेंबर रोजी, जगभरातील लोक एकत्र येतात आणि प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे हे सांगण्यासाठी हा दिन साजरा करतात.
हा दिवस म्हणजे कालांतराने आनंद करण्याचा आणि आपल्या जीवनातील सर्व अद्भुत गोष्टींसाठी आभार मानण्याची संधी निर्माण करणारा आहे.
तुम्हाला सुद्धा यावर्षीचा टिक टॉक दिन साजरा करायचा आहे. तर तुमची घड्याळं एका मिनिटाने पुढे ठेवा. घड्याळातील बदलत्या वेळेकडे लक्षपूर्वक पाहा. आणि त्या क्षणाचा आनंद घ्या.
टिक टॉक डे हा खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे.