जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

म्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक.

या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं सांगितलं जात आहे.

शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या पंथ चौक परिसरात गुरुवारी संध्याकाळी चकमक झाली होती.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला झालेल्या गोळीबारात तीन पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाले.

त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

(Photo : PTI)