रुपालीने शेअर केले वाढदिवसाच्या सेलेब्रेशनचे खास फोटो; हटके कॅप्शनने वेधलं लक्ष!

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.



रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे.



‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसलेने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.

रुपालीने तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केलेत.



हा फोटो शेअर करताना तिने लिहलंय 'हम साथ साथ हे'. तिच्या या कॅप्शनने सर्वांचाचं लक्ष वेधलंय.

रुपाली भोसले 'एका पेक्षा एक' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती.