अनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्यासोबत 'रब ने बना दी जोड़ी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
अनुष्का शर्मा ज्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे,
त्यापैकी दोन चित्रपट चित्रपट गृहांमध्ये रिलीज होणार असून एक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.
2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिल्यानंतर अनुष्का शर्मानं चित्रपटातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता.
तेव्हापासूनच अनुष्काच्या बॉलिवूडमधील पुनरागमनाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते.