बॉलिवूडमधील काही चित्रपट लोकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करतात. तरुणांवर आणि तरुणांसाठीच असे काही चित्रपट बनविण्यात आले आहेत. स्वामी विवेकानंद यांनी तरूणांना खूप प्रेरित केलं. स्वामी विवेकानंद यांची जयंती 'राष्ट्रीय युवा दिवस' म्हणून साजरी केली जाते. या प्रसंगी तुम्ही आमिर खानचा 'रंग दे बसंती' हा चित्रपट पाहू शकता. '3 इडियट्स' देखील तरूणांना प्रेरणा देणारा चित्रपट आहे. सुशांत सिंह राजपूतच्या 'छिछोरे' या चित्रपटानेसुद्धा तरुण वर्गाला मोटिव्हेट केलं. नुकताच 2023 मध्ये प्रदर्शित झालेला '12th fail' हा चित्रपट तरूणांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढवितो. विक्रांत मेस्सीचा '12th fail' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. दिया मिर्झाच्या 'धक-धक'चित्रपटाने देखील तरूणांना प्रेरित केलं आहे.