तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिल्याने अनेक पोषण तत्वे मिळतात. त्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोकं तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. पण तुम्हाला तांब्याच्या भांड पिण्याच्या पाणीसाठी वापरण्याची योग्य पद्धत माहित आहे का? जर तुम्हाला ही पद्धत माहित नसेल तर तुम्ही ती नक्की जाणून घ्यायला हवी. जे भांड तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असाल ते शुद्ध तांबं असायला हवं. तसेच ते भांड लिंबू आणि पाण्यानेच स्वच्छ करावं. तर तुमचं तांब्याचं भांडं काळं पडत असेल तर ते तुम्ही दररोज स्वच्छ धुवायला हवं. ताब्यांच भांड कधीही साबाणाने धुवू नये. कारण ते भांड साबण शोशून घेऊ शकतो. त्यामुळे पाण्याची चव बिघडू शकते. तसेच शरीरावरही त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये ते पाणी भरुन ठेवा आणि सकाळी ते पाणी प्यावं.