तुम्हालाही झटपट वजन कमी करायचंय? मग ग्रीन कॉफीचे सेवन नक्की करा



'ग्रीन कॉफी' बनवण्यासाठी हिरव्या रंगाच्या बिया कॉफीच्या रोपापासून वेगळ्या केल्या जातात आणि नंतर त्या भाजल्या जातात.



या बिया बारीक केल्यानंतर कॉफी पावडर बनवली जाते. कधीकधी हिरव्या बिया न भाजता वाळवून हिरवी कॉफी पावडर तयार केली जाते.



म्हणजे कॉफी बीन्स पूर्णपणे भाजून न घेता त्यांचा हिरवा रंग कायम ठेवून कॉफी बीन्सपासून बनवलेल्या कॉफीला 'ग्रीन कॉफी' म्हणतात.



जाणून घ्या ग्रीन कॉफी पिण्याचे कोणते फायदे आहेत.



ग्रीन कॉफी लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते.



ग्रीन कॉफीमध्ये अँटीओबेसिटी फॅक्टर असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.



याव्यतिरिक्त, ग्रीन कॉफीमध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स कार्बोहायड्रेट्स देखील असतात, ज्यामुळे एखाद्याला पोट भरल्यासारखे वाटते.



यामुळे भूक कमी लागते. तसेच ग्रीन कॉफीमुळे चयापचय क्रिया व्यवस्थित राहते.



काही संशोधनानुसार, ग्रीन कॉफी पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.