आरोग्यासाठी व्यायाम आणि शारीरिक हालचाली आवश्यक आहेत. काहीजण सकाळी व्यायाम करणे पसंत करतात, तर बरेच लोक संध्याकाळी व्यायामाचा आनंद घेतात. व्यायाम सकाळी करणे अधिक फायदेशीर की संध्याकाळी, याबाबत सविस्तर जाणून घ्या. मॉर्निंग वर्कआउटमुळे ऊर्जा आणि दिवसाची चांगली सुरुवात होते. सकाळच्या वेळी व्यायाम केल्याने सुसंगत दिनचर्येचं पालन करण्यास मदत होते. दुसरीकडे, संध्याकाळी व्यायाम केल्यास दिवसभरात जमा झालेला ताण दूर करण्यास मदत होते. सकाळी व्यायाम केल्यास ऊर्जा मिळते, त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवान वाटते. सकाळी व्यायाम केल्यामुळे चयापचय प्रक्रिया चांगली राहते. सकाळच्या व्यायामामुळे चयापचय वाढतो आणि तुमचं वजन संतुलित राहण्यासाठी मदत होते. सकाळी व्यायाम केल्यामुळे तुमची एकाग्र क्षमता आणि उत्पादकता वाढते, त्यामुळे प्रेरणादायी होतो. याउलट संध्याकाळी व्यायाम केल्यास दिवसाची सुरुवात ऊर्जादायी होत नाही. सकाळी व्यायाम न केल्याने अनेकांच्या दिवसाची संथ किंवा कंटाळवाणी होते. संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे झोपेवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे झोप लागणे कठीण होते. त्यामुळे, व्यायाम करण्याची वेळ ठरवताना सकाळ आणि संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे आणि तोटे विचारात घेण्यासारखे आहेत.