समोसा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे बिहारमध्ये समोश्याला सिंघाडा असं म्हटलं जातं. अनेक भारतीयांच्या मते समोसा हा भारतीय पदार्थ आहे. परंतु समोसा हा मूळचा भारतीय पदार्थ नाही. समोश्याला फार जुना इतिहास आहे. समोसा हा पहिल्यांदा इराणमध्ये बनवण्यात आला होता. फारशी भाषेत याला संबुश्क म्हटलं जातं. भारतात याला समोसा म्हणतात. परदेशी लोकांमुळे समोसा हा भारतात पोहचला. परंतु भारतात पोहचल्यानंतर समोश्यामध्ये अनेक बदल झाले.