थोडे काही दुखले की लगेच गोळ्या, औषधे घेण्याची अनेक सवय असते.

थोडंसं डोकं दुखत असेल किंवा हात-पाय जड झाले तर अनेक लोक हे पेनकिलर घेतात.

कारण त्याने दुखणे लगेच कमी होते.

पण, तुम्हाला माहितीये का? सतत पेनकिलर घेणं शरिरासाठी किती घातक ठरू शकते.

सतत पेनकिलर घेतल्यास मेंदू, हृदय आणि श्वसनयंत्रणेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतो.

संशोधनात असे आढळून आले की, पेनकिलर म्हणजे वेदनाशक औषध आहे.

पण, त्याचे तुमच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात.

पेनकिलर घेतल्याने तातपुरत्या वेदना कमी होतात.

पण याचे सतत सेवन केल्यास ळमळ, अपचन, उलट्या आणि जुलाब या सारख्या समस्या उदभवू शकता.

त्यामुळे शक्य तो कोणत्याही आजारावर वैद्यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी.