नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते. जाणून घ्या फायदे

जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात, त्यामुळे तोंडाची चव वाढते.

पान खाल्ल्याने की तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही.

जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात

विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारांमध्ये ते उपयोगी आहे.

घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा बसतो.

अशा वेळी ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विड्याची पाने चावून चघळून खावीत.

विड्याची पाने देठासकट खावीत. याने पोट साफ होते.