जेव्हा दम्याचे निदान होते, तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम औषध लिहून देतात.

अर्थात औषधेही प्रभावी असतात.

पण, त्याहून प्रभावी उपचार पद्धती म्हणून इन्हेलरचा वापर केला जातो.

डोळ्याचे आजार झाले तर आपण डोळ्यात औषध घालतो.

कानांचा आजार झाला तर कानात औषध घालतो.

इन्हेलर अगदी त्याच प्रकारे कार्य करते.

फुप्फुसांचा आजार झाला म्हणून थेट फुप्फुसांपर्यंत औषध पोहचविण्याचे कार्य या इन्हेलरद्वारे होत असते.

गेल्या २० ते २५ वर्षांपासून इन्हेलर थेरपी ही दम्याच्या उपचारासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले जाते.

इन्हेलरद्वारे औषधे थेट प्रभावित भागांपर्यंत पोहोचून त्वरीत उपचार मिळण्यास मदत होते.

औषधांच्या तुलनेत इन्हेलरमधील औषधांचे घटक दहा ते शंभर पटीने कमी असतात.