सध्या प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे.

याचा परिणाम फुफ्फुसांवर होतोय.

त्यामुळे लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी पडत आहेत.

आरोग्य तज्ञांच्या मते, वातावरणात प्रदूषण इतके पसरले आहे की, जे लोक सिगारेट पीत नाहीत.

त्यांना सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोगाची समस्या उद्भवतेय.

अलीकडे दिल्ली आणि आसपासच्या भागात हवेचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

दिल्ली आणि आसपासच्या रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय.

यामुळे अनेक रुग्णांना इन्हेलरचा सहारा घ्यावा लागतोय.

तसेच काही रुग्णांमध्ये दम्याची लक्षणेही दिसून येत आहेत.

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.