विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच हवाई दलाच्या विमानांचा खास एअर शो पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाची विमाने स्टेडियमच्या वर दिसली. हवाई दलाची ही विमाने अहमदाबादच्या आकाशात 15 मिनिटे प्रात्यक्षिके दाखवत होती. यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमने हा एअर शो सादर केला. यावेळी हवाई दलाची 9 विमानं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून कसरत करताना दिसली. ही विमाने अनेक वेळा स्टेडियमवरून वेगवेगळ्या फॉर्मेशन्स तयार केल्या. सूर्य किरण हा भारतीय हवाई दलाची एक टीम आहे, जो देशात एरोबॅटिक्स शो करत आहे.