गायिका वैशाली माडे-भैसने हिने सोशल मीडियावरून नेटकऱ्यांचे आभार मानले

गेल्या काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट लिहिली होती.

वैशालीने आपल्या जीवाला धोका असल्याची पोस्ट तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली होती.

त्यानंतर तिने आता पाठिंबा दिलेल्या नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत.

बांधवानो काही दिवसापूर्वीपासून काही लोक द्वेषभावनेने माझ्यावर आन्यायी षडयंत्र चालविण्याचा प्रयत्न करीत आसल्याचे माझ्या लक्षात आल्याने काही लोकांकडून माझ्या जिवीतास धोका आहे.

माझ्या हत्येचा कट रचला जातोय. याबाबद पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्य स्फोट मी करणार आशी पोष्ट टाकून तुम्हा भावंडाकडे मदतीची मागणी ही केली होती.

आपण सर्वांनी तत्परतेने दखल घेतल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.

तुम्हा भावंडाचे माझ्या पाठीशी पाठबळ आसल्याने सगळे घडून आले आहे, अशा भावना वैशालीकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

वैशाली माडेच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.