थलापती विजयचा'लियो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. 'लियो' या सिनेमात थलापती विजय आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. 'लियो' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 64.8 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 35.25 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी 39.8 कोटींची कमाई केली. तर चौथ्या दिवशी 41.55 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत 'लियो' सिनेमाने भारतात 206.40 कोटींची कमाई केली. तर जगभरात या सिनेमाने 363.4 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'लियो' सिनेमाने 'गदर 2'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. केरळमध्ये रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.