अमृता फडणवीस गाण्याबरोबरच मॉडेलिंग आणि बँकिंग व्यवस्थापन करतात. त्या फॅशन आणि स्टाईलमध्ये बऱ्यापैकी एॅक्टिव्ह असतात. अमृता फडणवीस यांचे लाखो चाहते आहेत. अमृता फडणवीस यांच्या ड्रेसिंग सेन्समुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. त्या वेळोवेळी नवीन लूकमध्ये दिसत राहतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य प्रत्येक लूकची शोभा वाढवतात. यावेळी त्यांनी चित्ता प्रिंटेड ड्रेसची स्टाईल केली आहे. उंच हील सैंडल आणि काळ्या रंगाच्या बॅगमुळे त्यांच्या ड्रेसची शोभा आणखीनच वाढतेय. अमृता फडणवीस प्रत्येक प्रकारच्या ड्रेसमध्ये परफेक्ट आणि सुंदर दिसतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2006 मध्ये अमृता फडणवीस यांच्याशी विवाह केला. अमृता फडणवीस नागपूरच्या अॅक्सिस बँकेत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट देखील आहेत.