ग्लेन मॅक्सवेल लग्न बंधनात अडकला भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत लग्न केलं मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न 18 मार्च रोजी झालं ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय. मॅक्सवेल आणि विनी यांचा साखरपुडा 2020 मध्ये झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, कोविड आणि लॉकडाऊनमुळं मॅक्सवेलचं लग्न रखडलं होतं. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे मॅक्सवेल आणि विनी रमन 2017 पासून एकमेकांना डेट करीत होते. अखेर आज त्यांनी लगिनगाठ बांधली