'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व सध्या विविध कारणाने चर्चेत आहे.

एका टास्कदरम्यान तेजस्विनी लोणारीला दुखापत झाली आहे.

त्यामुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनीला बिग बॉसचं घर सोडावं लागणार आहे.

तेजस्विनीला घर सोडावं लागणार असल्याने घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्याने तिला घर सोडून जाणे अपिरिहार्य आहे.

तेजस्विनीला घर सोडावं लागणार यावर घरातील सदस्यांचा विश्वास बसत नव्हता.

तेजस्विनी लोणारीचा मोठा चाहतावर्ग आहे.

बिग बॉसच्या घरात 50 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्याने रणवीर सिंहनेदेखील तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या होत्या.

तेजस्विनीला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत.

चाहत्यांसाठी तेजस्विनीच बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची विजेती होती.