अभिनेत्री अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते.
सध्या मुनमुन ही जर्मनीमध्ये आहे. जर्मनीमध्ये मुनमुनचा अपघात झाला आहे.
नुकतीच मुनमुननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन अपघाताबाबत माहिती दिली.
मुनमुननं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
पोस्टमध्ये मुनमुननं लिहिलं, 'माझा जर्मनीत एक छोटासा अपघात झाला. माझा डावा गुडघा खूप दुखत होता. त्यामुळे मला माझी ट्रिप इथेच संपवून घरी परत यावे लागेल'.
ट्रॅव्हल प्रेमी मुनमुन दत्ता ही एक आठवड्यापूर्वी युरोप ट्रीपला गेली होती. त्यानंतर तिने स्वित्झर्लंड आणि जर्मनीला भेट दिली आहे.
मुनमुनच्या गुडख्याला दुखापत झाली आहे.
मुनमुननं तिच्या स्वित्झर्लंड ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.