चंद्रपुरात युट्युबच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट या फळशेतीचे धडे घेत शेतीचा यशस्वी प्रयोग केला.



या भागातील शेतजमीन ही मुरमाड असल्याने चना-सोयाबीन सारखी पारंपरिक पिकं फायदेशीर ठरत नव्हती.



मुरमाड जमिनीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा त्यांचा शोध ड्रॅगन फ्रुट या फळशेतीपाशी येऊन थांबला.



लातूर-सांगोला या भागात जाऊन ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची खरेदी केली.



शेतीमध्ये बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर या रोपांची ट्रेलर पद्धतीने लागवड करण्यात आली.



सध्या या रोपांनी जोम धरला असून साधारण एक वर्षांची झाली की रोपांना फळधारणा व्हायला सुरुवात होईल.



साधारण एक एकर लागवडीसाठी त्यांना सात लाखांचा खर्च आला



पहिल्याच वर्षी चार लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.



पुढील 15 वर्ष ही रोपं त्यांना उत्पन्न देणार आहे.