हृता दुर्गुळेच्या 'अनन्या' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 'अनन्या' सिनेमा 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे', अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. हृता दुर्गुळे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हृताची 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. हृता लवकरच प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.