झोमॅटोवर आता फक्त जेवणच सर्च नाही होतं, तर लोकं स्वतःसाठी नवरी आणि गर्लफ्रेंडही सर्च करत आहेत.
झोमॅटोच्या वार्षिक रिपोर्टमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे की, भारतात लोकं झोमॅटोवर स्वतःसाठी गर्लफ्रेंड आणि नवरी शोधत आहेत.
मनीकंट्रोलनुसार, मागच्या वर्षी झोमॅटोवर 4940 लोकांनी गर्लफ्रेंड सर्च केलं, तर 40 युजर्सनी झोमॅटोवर नवरी शोधण्याचा प्रयत्न केला.
झोमॅटो एक ऑनलाईन फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म आहे, यावर आपण आसपासच्या रेस्टॉरंट्समधून घरपोत जेवण मागवता येतं.
झोमॅटोसोबतच क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटवरसुद्धा वेगळा ट्रेंड पाहायला मिळाला. ब्लिंकिटवर स्नॅक्स मोठ्या प्रमाणात ऑर्डर केले गेले.
ब्लिंकिटवर 31डिसेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत आलू भुजियाचे 2.3 लाख पॅकेट्स ऑर्डर केले गेले आणि 6834 पॅकेट्स आईस क्युबची डिलीव्हरी झाली.
न्यू ईयर ईव्हसाठी ब्लिंकिटवर कंडोमचीसुद्धा मोठी डिमांड होती.