तुमचा लॅपटॉप वेळोवेळी अपडेट करत रहा. अपडेट न करणे लॅपटॉप हँग होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे लॅपटॉप अपडेट करणे खूप गरजेचे आहे.
लॅपटॉपमध्ये अँटी-व्हायरस इंस्टाल करून ठेवा. कधीही गैर लिंक किंवा ॲप्लिकेशनला लॅपटॉपमध्ये इंस्टाल करू नका.
हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. हेही लॅपटॉप हँग होण्याचे मोठं कारण आहे.
तुमच्या लॅपटॉपमध्ये एकापेक्षा अधिक अँटी-व्हायरस ठेवू नका. कारण हे तुमचा लॅपटॉपला हँग होण्याचं कारण ठरु शकते.
तुमच्या लॅपटॉपचा रॅम स्टोरेज वाढवा. तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये 8GB रॅम लावू शकता. यामुळे तुमचा लॅपटॉप हँग होण्यापासून वाचेल.
तुम्ही तुमच्या लॅपटॉपमधील डिस्क स्टोरेज क्लीन करत रहा. स्टोरेज क्लीन न करणे हे तुमच्या लॅपटॉप हँग होण्याचे कारण ठरू शकते.
अनेकदा बॅकग्राऊंड ॲप्स हे चालू असतात, त्यामुळे सुद्धा तुमचा लॅपटॉप हँग होतो. त्यामुळे बॅकग्राऊंड ॲप्स क्लीन करत रहा.
या व्यतिरिक्त ब्राऊजरची हिस्टरी क्लीन करा आणि ओरिजनल विंडोचा वापर करा. लॅपटॉप चालू असताना मधे-मधे ब्रेक घेत रहा. यामुळे तुमच्या लॅपटॉप रिफ्रेश होतो आणि नव्याने काम करू लागतो.
तर या टिप्स तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील आणि तुमची लॅपटॉप हँग होण्याच्या समस्येपासून सुटका होईल.