भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच रुळावर धावणार आहे.

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही हरीयाणामध्ये चालणार आहे.

हायड्रोजन ट्रेनचे सोनीपत या ठिकाणी ट्रायल केले जाईल.

रिपोर्ट नुसार भारताची पहिली हायड्रोजन ट्रेनची स्पीड 110 किमी प्रति तास असेल.

या ट्रेनमध्ये 8 डब्बे आहेत आणि 2500 प्रवासी प्रवास करू शकतील.

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही संपूर्ण डिजीटल असणार आहे.

जींद रूट नंतर ही ट्रेन दार्जिलिंग, नीलगिरी, कालका, शिमला या रूटवरती चालवणार आहेत.

यानंतर माथेरान रेलवे, कांगजा वैली, आणि मारवाड-देवगड मदारिया हे रूट सुध्दा शामिल आहेत.

या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रदूषण कमी करणे आणि हरित वाहतूक प्रणालीला प्रोत्साहन देणे आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.